HW News Marathi
महाराष्ट्र

Teachers Day | शिक्षक दिनी ज्ञानदाते रस्त्यावर

मुंबई | ज्ञानदानाचे पवित्र काम करणा-या शिक्षकांना सध्या पगार व नोकरीची खात्री नसल्याचे राज्यात चित्र पहायला मिळत आहे. बुधवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ‘शासनाची महाआरती’ करून अनोख्या प्रकारे निषेध नोंदविणार आहेत.

२००५नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. मराठवाडा, विदर्भात वर्षानुवर्षे विनावेतन काम करणारे शिक्षक भीक मांगो आंदोलन करणार आहेत. अकोला, वाशिम व बुलडाण्यात ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत. या आधीही या शिक्षकांनी व्यथा मांडली़ मात्र सरकारने दखल घेतली नाही़ वेळेवर वेतन मिळत नसल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी निषेध व्यक्त करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना अजून बाल्यावस्थेत नारायण राणेंची पुन्हा टीका!

News Desk

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री

News Desk