HW News Marathi
देश / विदेश

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि निसर्गातल्या जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यांच्या या संशोधनाची आंतरराष्ट्रीय नियतकालीकानेही दखल घेतलीय. याबद्दल त्यांनी आपल्या इन्स्टा पेजवरून माहिती दिलीय. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मेघालयच्या टेकड्यांत त्यांनी या दुर्मिळ प्रजाती शोधल्यात.

तेजस ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत त्यांनी स्चिस्तुरा हिरण्यकशी नावाची माशाची दुर्मिळ प्रजात शोधलीय. ऍक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथॉलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने सप्टेंबर २०२० च्या अंकात या संशोधनाची दखल घेतलीय. तसंच अंकाच्या कव्हर पेजवरही त्यांनी या माशाचा फोटो प्रसिद्ध केलाय.

मेघालयातील खासी टेकड्यांतून तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असलेला चन्ना स्नेकहेड हा मासाही शोधलाय. कोपिया-अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथॉलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशिअल जर्नलने या संशोधनाची दखल घेतलीय. या जर्नलमध्ये त्यांचं हे संशोधन प्रसिद्ध झालंय.

चन्ना स्नेकहेड या माशाच्या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचंही तेजस यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. ऑरिस्टॉन यांनीच पहिल्यांदा या माशाची प्रजात शोधली होती.तेजस यांनी याआधीही माशाच्या वेगवेगळ्या प्रजाती शोधल्या आहेत. याबद्दल त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे सत्तांतर प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच; 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

Aprna

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले, ६ जणांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी

News Desk

न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यात यावे !

News Desk