HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतर मंदिरे सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (८ नोव्हेंबर) जनतेशी फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीत सगळ्यांनी काय नियम पाळायचे याबद्दल माहिती दिली. फराळ करा, रोषनाई करा मात्र फाटके उडवताना सावधगिरी बाळगा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात कमी झाली असली तरी सावध राहणे गरजेचे आहे. दुसरी लाट कोरोनाची आली तर पुन्हा लॉकडाऊन करणे अवघड जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

युरोपात कोरोनाची दुसरी लाट नाही तर त्सुनामी आली. महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मला तुमच्यावर कोणतीही आणीबाणी लादायची नाही आहे. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे मंदिरे सुरु कधी होणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री असे म्हणाले की, मंदिरे लवकर सुरु करणार आहोत. मात्र, त्यासाठी काही नियमावली करणे गरजेचे आहे. म्हणजे गर्दी न करणे, मंदिरात मास्क लावणे या अशा काही नियमावली करत दिवाळीनंतर मंदिरे सुरु करण्याचे संकेत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घेण्यास तयार आहे. कारण, मंदिरे सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र, जर कोरोना संख्या वाढली तरीही टीका केली जाणारच. विरोध करणारे नंतर जबाबदारी घ्यायला येणार नाहीत, असे म्हणत विरोधकांवर टीकाही केली आहे.त्यामुळे मुद्दामून मंदिरे उशीरा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आवश्यक ती नियमावली करुनच मंदिरे सुरु करण्यात येणार आहेत. हळूहळू पुर्वपदावर येण्यात प्रयत्न आपण करत आहोत. कारण कोरोनाच्या लढाईत लढण्यासाठी मास्क हेच महत्वाचे शस्त्र आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

News Desk

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश, तर निर्णयाला दुकान मालकांकडून विरोध!

News Desk

तर गरज पडल्यास भाजपमध्ये प्रवेश करु…बच्चू कडूंचे मोदींना आव्हान!

News Desk