HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारचा “ब्रेक द चेन”चा नारा ! आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई | राज्यातील प्रचंड वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करायचा की निर्बंध ह्यातून आता अखेर राज्य सरकारने मार्ग काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (४ एप्रिल) याबाबत मध्य मार्ग काढत राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून सार्वजनिक वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

“खाजगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालये ५०% क्षमतेने सुरू राहणार असून कोविडशी संबंधित सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरु राहील. मात्र, जे आरोग्य विभागाशी संबंधित नाही त्यांनी ५० टक्के उपस्थित राहून उर्वरीत ५० टक्क्यांनी वर्क फ्रॉम होम करावे” असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

ऑक्सिजन लागणाऱ्या कारखान्यावर बंदी !

“ऑक्सिजन ज्या कारखान्यात लागतो त्या कारखान्यावर बंदी आणण्यात येईल. कोरोना लसीकरण दिवस रात्र सुरूच असणार असून राज्यातील सिनेमा शूटिंग लसीकरणाच्या अटीवर सुरूच राहील. या काळात राज्यातील धार्मीक स्थळे पूर्णपणे बंद राहणार असून भविष्यात लवकरात लवकर उघडण्याचा प्रयत्न करू. राज्यातील सलून, ब्युटीपार्लर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सहकारी संस्थांच्या निवडणूकाही पुढे ढकलण्याचा निंर्णय मुख्यमंत्री घेतील”, असेही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

“लग्नात फक्त ५० जणांना परवानगी देण्यात आली असून अंत्यविधी साठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येईल अन्यथा मंगल कार्यालय चालकाला १० हजारांचा दंड केला जाईल”, असेही राजेश टोपे म्हणाले.

ब्रेक द चैन हा या कडक निर्बंधाचा नारा !

“ऑक्सिजन आणि रेमडिसीविर यांचा जास्त प्रमानात कंपन्यांनी पुरवठा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. राज्यातील साखर कारखाने हे या काळात पूर्णपणे चालू राहतील. डॉक्टर, आयसीयू बेड वाढवण्याचा निर्णय देखील झाला असून शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन केल्या जाईल. ब्रेक द चैन हा या कडक निर्बंधाचा नारा”, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करूं’चा प्रयत्न फसला…

News Desk

मुंबईतील MMRDA मैदानात क्वॉरंटाईन सुविधेची पाहणी करताना शरद पवार

News Desk

केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार, लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची – पंतप्रधान

News Desk