HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकार संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत ? उद्या होणार सर्वपक्षीय बैठक

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची केले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या म्हणजेच शनिवारी (१० एप्रिल) दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील विरोधकांचा लॉकडाऊनला कडाडून विरोध आहे. तर राज्य सरकार मात्र तशाच पद्धतीचा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळेच, या सर्वपक्षीय बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ठाकरे सरकारने सध्या राज्यात अन्य दिवस कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, आता सरकार संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या विचार करत असल्याचे वृत्त आहे. म्हणूनच, उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे राज्याचे लक्ष आहे. या बैठकीला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहतील अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सद्यस्थितीत मुंबईत जाण्याची हिंमत माझ्यात नाही | नितीन गडकरी  

News Desk

पुण्यातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये १० ते १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा !

News Desk

भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण

News Desk