HW News Marathi
महाराष्ट्र

“उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई | “उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत”, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. यावेळी राऊतांनी शिंदे सरकारवर राज्यपालांवरून निशाणा साधला.

राऊत म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शइवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. ते केवळ उदयनराजे भोसलेंचे अश्रू नाहीत तर समस्त महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील तो आक्रोश आहे. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने मात्र राज्यपालांना हटवण्यात हतबल आहेत आणि आज प्रतापगडावर जाऊन ते ढोंग करत आहेत”, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री तोंड शिवून गप्प बसलेले  

राऊत  म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमना करणारे राज्यपाल अजूनही राजभवनात आहेत. आणि मुख्यमंत्री तोंड शिवून गप्प बसलेले आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेंनी देखील महाराजांवर बोलवून सुद्धा त्या पदावर आहेत. तरही तुम्ही त्यांचे समर्थन करत आहात, अशा मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का?”, असा सवाल राऊतांनी राज्यातील जनतेला उद्देशून म्हणाले.

 

 

 

Related posts

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

News Desk

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk

विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी

News Desk