HW News Marathi
महाराष्ट्र

“पोलिसांनी घालून दिलेल्या नियमात राज ठाकरेंनी सभा घ्यावी,” दिलीप वळसे पाटलांचे आवाहन

मुंबई | “पोलिसांनी घालून दिलेल्या नियमात राज ठाकरेंनी सभा घ्यावी,” असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले आहे. यामुळे आता राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार आहे.  गृहमंत्र्यांनी आज (१७ मे) पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील सभे दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल होणार, अशी माहितीही त्यांनी दिली. 

राज ठाकरे हे पुण्यात २ दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले आहे. पुण्यात मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पुण्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार असून पुण्यात मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना भेटणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या पुण्यात सभा कुठे घ्याची, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. सभेसाठी पोलिसांची परवानगी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मनसे नवीन पक्ष म्हणून जन्माला आल्यानंतर लगेत पुणे महापालिका निवडणुकीच्या लागल्या होत्या. या निवडणुकीत मनसेला २८ नगरसेवक निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर मनसे जोमाने कामाला लागले आहे. राज ठाकरे हे उद्या (१८ मे) नाराज वसंत मोरे यांना भेटणार असल्याची माहिती टीव्ही ९ कडून मिळाली आहे. राज ठाकरे हे २१ मेला पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती टीव्ही ९कडून मिळाली आहे. राज ठाकरे पक्ष बांधणीबाबत मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात असेल. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार; पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश

Aprna

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया नाही | सुनिल तटकरे

News Desk