HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, मराठी अभिनेत्याला अटक

ठाणे |सध्या सोशल मिडीयावर नेत्यांबद्दल, देशातील एकूण परिस्थितीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्याच्या बाबी वाढत चालल्या आहेत. नुकतंच ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Mayuresh Kotkar) यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पनवेलच्या उपमहापौरांवर गुन्हा दाखल

रायगडचे आगरी खूप डेंजर आहेत, ते आपल्या घरात कोयते ठेवतात. त्यामुळे एअरपोर्टला नाव द्यायला आल्यास ते परत जाणार नाहीत, असं वक्तव्य सोशल मीडियावर केल्याने पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी एकेरी शब्द वापरत गायकवाडांनी बदनामीकारक वृत्त खाजगी युट्यूब चॅनलवरुन प्रसारित केल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृष्णा-कोयना नदीने ओलांडली धोक्याची पातळी

News Desk

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

Aprna

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला!

News Desk