HW News Marathi
महाराष्ट्र

ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांनी आज (३१ ऑगस्ट) उस्मानाबाद जिल्ह्यात ‘परिवार संवाद’ नावाने जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेतील उस्मानाबादमधील जनतेपुढे राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाची जाहीर घोषणा केली आहे. “उस्मानाबादसाठी पाटील घराण्याने भरपूर केले हे जिल्हावासीयांना माहीत आहे. काळजावर दगड ठेवून मी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात जिल्हा मागे राहू नये यासाठी पक्षांतर करत आहे”, असे राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले.

“शरद पवार हे आमचे दैवत आहेत, होते आणि यापुढेही राहतील”, असेही राणाजगजितसिंह पाटील म्हणाले. दरम्यान, खरंतर राणाजगजितसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील हे उस्मानाबादमध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शिवस्वराज्य यात्रेत उपस्थित न राहिल्याने राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय निश्चित होत असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. तसेच राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याच्या चर्चा देखील समोर आल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, पटोलेंचा मोठा

News Desk

अन् ‘मराठी श्रीवल्ली’कार, विजयच्या गालावर आनंदाची कळी खुलली

Aprna

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

swarit