HW News Marathi
महाराष्ट्र

वाद पेटला! संजय राऊत यांची चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस

मुंबई। संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. आणि आता आकारास अजिबातच पत्नी मात्र, आता एका प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवलीय. माझ्या बदनामीबाबत माफी मागा. अन्यथा मानहानीचे प्रकरण न्यायालयात दाखल करणार, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलाय.

सव्वा रुपयांचा दावा लावू

चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला होता.चंद्रकांतदादांनी पाठवलेल्या पत्रात काही दळभद्री आरोप केले आहेत आमच्यासंदर्भात. पीएमसी बँक आणि अमूक बँक. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर दावा करणार आहे. इतर लोकं लावतात 100 कोटी, 50 कोटी असा दावा करणार नाही. सव्वा रुपयांचा दावा लावू. त्यांची तेवढीच ताकद आहे. सव्वा रुपयेच फक्त. त्यांच्याकडे तेवढेच आहेत. सव्वा रुपयावाले आहेत. 100 कोटींचा दावा कशाला? मला नको शंभर कोटी. ज्यांना हवा ते दावा लावतात. सव्वा रुपया ठिक आहे. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा असतो, असा चिमटाही त्यांनी काढला होता.

वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसीला चंद्रकांत पाटील आता काय उत्तर देतात

संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसीला चंद्रकांत पाटील आता काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत!– उपमुख्यमंत्री

Aprna

सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही – गुलाबराव पाटील

News Desk

कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत!

News Desk