HW News Marathi
महाराष्ट्र

आषाठी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी, अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

पुणे | राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे अनेक सण उत्सव सुरु होताना दिसत आहेत. अशात आषाढी वारीला पालखी कशी न्यायची हा मोठा प्रश्न वारकऱ्यांसमोर उभा होता. यावर आता ठाकरे सरकारने निर्णय दिला आहे. आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. आज (११ जून) पुण्यात ते बोलत होते. दरम्यान, आषाढी वारीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विचार करुन हे सांगतिलं आहे. त्यामुळे या वारीला १० मानाच्या पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार आहेत. यावेळी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, देहू आळंदी पालखीबरोबर १०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

१० मानाच्या पालख्या कोणत्या?

१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

२- संत तुकाराम महाराज (देहू)

३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

५- संत सोपान काका महाराज (सासवड)

६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७- संत एकनाथ महाराज पैठण

८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती

९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)

१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले आहेत.

भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद

दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

News Desk

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच !

News Desk

“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk