HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंना मंत्रिपदाचे गाजर दाखवून भाजपने झुलवले

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता पुन्हा एकदा लांबवणीवर पडली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष अमित शहांना वेळ नाही. तर, दुसरीकडे पक्षाच्या विरोधात तयार होत असलेले वातावरण पाहून भाजपने गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेचे निवडणूक निकाल येईपर्यंत वाट पाहण्याचे ठरविल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपच्या राज्य कोअर कमिटीची सोमवारी रात्री मुंबईत बैठक पार पडली. यावेळी त्यावर साधकबाधक चर्चा झाली मात्र, ठोस असे काहीही ठरले नाही. दरम्यान, नारायण राणे यांच्याबाबत भाजपने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये पूर्णवेळ बिझी आहेत. त्यामुळे इतर विषयांकडे पाहायला त्यांना वेळ नाही. राज्यातील काही नेते गुजरातमधील निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्यातील फडणवीस सरकारचा विस्तार आता पुढे ढकलला जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. गुजरात व हिमाचलचे निकाल 18 डिसेंबरला येणार आहेत. तर राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 11 डिसेंबरनंतर सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला नव्या वर्षात तेही मकर संक्रांतीनंतरचा मुहूर्त लागेल असे भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी…

News Desk

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट सरकार  

News Desk