HW News Marathi
महाराष्ट्र

देवाच्या व धर्माच्या नावावर भाजपाकडून जनतेची लूट! – अतुल लोंढे

मुंबई | भाजपा हा कधी राम मंदिर बांधण्याचा नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करते तर कधी विक्रांत बचावच्या नावाखाली पैसे गोळा करुन जनतेच्या भावनेशी खेळत आहे. या पैशांचा कसलाही हिशोब दिला जात नसून देवाच्या, धर्माच्या व राष्ट्रप्रेमाच्या नावावर जनतेची दिशाभूल करुन लुट केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रभक्तीच्या नावाखाली युद्धनौका आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेतून जनतेकडून पैसे वसूल केले. युद्धनौकेचे स्मारक उभारण्यासाठी जनतेकडून निधी गोळा केला परंतु त्या पैशाचे काय झाले याचे उत्तर जनतेला अनेक वर्ष मिळाले नाही. हे पैसे गोळा करुन त्यांनी पक्षाला दिले असे दोन दिवसापूर्वी समजले. म्हणजे युद्धनौकेच्या नावाखाली जनतेच्या भावनेशी सोमय्या यांनी खेळ करून जमा केलेल्या पैशाच्या अपहार केला.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या नावाखाली भाजपाने करोडो रुपये गोळा केला. रामाच्या नावावर पैसा गोळा करताना त्यातही अपहार करण्यात आला. रामाच्या नावावर किती पैसे जमा केले याचा सुद्धा कुठलाही हिशोब दिला नाही. रामाच्या नावावर जमा केलेले करोडो रुपये व सोने लुटल्याचा आरोप साधू-संतांनीच केला. राम मंदिराच्या नावावर आतापर्यंत जमा केलेल्या पैशाचा कुठलाही हिशोब लागत नाही. अयोध्येत मंदिर परिसरातील जमीन व्यवहारात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार भाजपा नेते व त्यांच्या समर्थकांनी केला आहे. धर्माच्या व देवाच्या नावावर भाजपा धंदा करत असून हा जनतेच्या भावनेशी केलेला खेळ आहे असेही लोंढे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी झगडतोय..ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायत,उद्धव ठाकरे होणं अवघडं!

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk

एकनाथराव खडसे व रोहिणीताईं पासून माझ्या जीवाला धोका; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Aprna