HW News Marathi
Covid-19

‘मिस्टर इंडिया’चा किताब जिंकणाऱ्या मराठमोळ्या बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनानं निधन!

बडोदा | कोरोना महामारीत अनेक जणांचा किड्या मुंग्यांसारखा जीव जात आहे. दरम्यान, मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

जगदीश लाडने अतिशय कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास ४ वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं. मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनने जगदीश लाडच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीच्या परीक्षा रद्दच, मात्र बारावीच्या परीक्षा…! । वर्षा गायकवाड

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

देशात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक २६५ जणांचा मृत्यू, तर ११ हजार २६४ जण कोरोनामुक्त

News Desk