HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी आज संवाद साधणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 एप्रिल) संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणती महत्त्वाची घोषणा करणार याकडेही जनतचे लक्ष लागले आहे.

उद्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन असून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रेक द चेनच्या अंतर्गत लागू असलेले नियम उद्या (१ मे) सकाळी ७ वाजता शिथिल होणार होते. मात्र, यात आता वाढ करत १५ मेपर्यंत ते वाढवण्यात आले आहेत. या सगळ्या कोरोनाच्या परिस्थीत शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांबाबत निर्णय कधी घेणार आहात ?”

News Desk

हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार, विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच केले नाहीत

News Desk

अजित पवारांची वकिली करायला गेले अन् इज्जतीचा कचरा केला ! राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

News Desk