HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नी रजनी कुडाळकरांची आत्महत्या; कारण अद्याप स्पष्ट

मुंबई। शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रजनी कुडाळकर वय ४२ असून त्यांनी मुंबईतील कुर्ला मधील नेहरू नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. कुर्ला मतदारसंघाचे मंगेश कुडाळकर हे आमदार आहेत. रजनी कुडाळकर यांनी काल (१७ एप्रिल) गळफास लावून आत्महत्या केली.

रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्यात काल रात्री ९.१५ ते ९.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रजनी कुडाळकर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परंतु, रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात – चंद्रकांत पाटील

News Desk

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट- IMD

News Desk

चौकशी अधिकारी छळ करत आहेत ! रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

News Desk