HW News Marathi
महाराष्ट्र

पोरक्या बहीण- भावाची एका तपानंतर घडली भेट

स्पेशल स्टोरी

विनोद तायडे

हिंगोली – वर्ष- दोन वर्षांचे नकळते वय असतानाच त्या दोघांवरचे माता-पित्याचे छत्र हरपले. . . पालन- पोषणाची व्यवस्था लावण्यासाठी एकाला मामा, तर दुसऱीला आजी घेऊन गेली. अजाणत्या वयात ताटातूट झाल्यामुळे सहोदर भावंड असूनही एकमेकांची साधी तोंडओळख त्यांना नव्हती. पण तब्ब्ल एक तपानंतर ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या पूनर्भेटीचा तो सुवर्णक्षण आला. दहा वर्षांनी आपल्या सख्या भावंडाला भेटल्यावर दोघांनाही अश्रु अनावर झाले. हर्षद वय वर्षे दोन आणि जान्हवी वय वर्ष एक यांचे आईवडील लहानपणीच काळाच्या पडद्याआड गेले. हक्काचे घर उरले नाही. त्यामुळे हर्षदलामामा रामकृष्ण कोकाटे याने रिसोड येथे आणि जान्हवीला आजीने हिंगोली येथे नेले. त्यामुळे लहानपणीच भावा बहिणीची ताटातूट झाली.

स्पेशल स्टोरी

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगांव येथील सतीश तुकाराम जाधव यांचा विवाह वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आशा दत्तराव कोकाटे यांच्यासोबत २००१ मध्ये झाला. त्यांना हर्षद व जान्हवी ही दोन अपत्ये झाली. मात्र त्यानंतर २००५ साली पती पत्नीत वितुष्ट आले आणि दोघे विभक्त झाले. त्यानंतर दोन वर्षांत २००७ साली आशा यांचे निधन झाले. तेव्हापासून मामाने हर्षदला रिसोड येथे आणले आणि बहीण भावाची ताटातूट झाली. त्यातच सतीश यांचेही२०१४ साली अपघाती निधन झाले. कोवळ्या वयातच हर्षद व जान्हवी यांचे मायेचे छत्र हरवले. आता जान्हवी तिच्या आजीकडे राहू लागली.

दरम्यान, शेजारीच राहणारे शिक्षक जनार्दन जाधव व रिसोड येथे राहणारे रामकृष्ण कोकाटे या दोघांनी तब्बल १० वर्षानंतर बहीण भावाची भेट घालून देण्याचे ठरविले. ऐन रक्षाबंधनाच्या सणाला दहावीत शिकणारा हर्षद आणि आठवीत शिकणारी जान्हवी या भावाबहिणीची भेट हिंगोली येथे घडवूनआणण्यात आली. आपल्या भावाला पाहताच बहिणीने हंबरडा फोडला आणि ‘दादा कुठे होतास रे इतके दिवस! आईबाबा गेले, आपण उघडे पडलो रे दादा,’ असेम्हणत भावाला मिठी मारली. बहीण – भावांच्या डोळ्यांत सुखाश्रु तरळले. तब्बल दहा वर्षानंतर बहिणीने भावाला राखी बांधली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk

कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

News Desk

“१३ तारखेला घडलेली घटना, ही १२ तारखेच्या घटनेचं रिएक्शन होती !”- देवेंद्र फडणवीस

News Desk