HW News Marathi
महाराष्ट्र

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’; त्यावरच गोळा होतो ‘चंदा’! – शेलार

मुंबई। बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”! “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले” महाराष्ट्र बंदवरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात आज सत्ताधारी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदचा एल्गार पुकारला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपने बंदमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन करताना सत्ताधाऱ्यांवर धारदार शब्दांचे बोचरे वार केलेत.

आशिष शेलार म्हणतात…

“बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले”

हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

News Desk

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk

पुण्यात धावली मेट्रो, अजित पवारांच्या उपस्थितीत वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

News Desk