HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी मतांनी विजयी झालेले उमेदवार

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजप १०३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ५० जागा मिळाल्या आहेत. राज्यातील जनतेने कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही हे चित्र दिसून आले आहे. या निवडणुकीत काही जणांचा मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाला तर काहीचा मोठ्या फरकांने पराभव झाला. मात्र, निवडणुकीत असे ही काही उमेदवार आहे की, ज्यांना कमी मतांनी विजयी झाले आहेत.

चांदिवली मतदारसंघात शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या मोहमद अरिफ खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला आहे. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अबुल खान यांना ८८७६ मते मिळाली आहेत. हा निसटता विजय शिवसेनेसाठी दिलासा देणारा तर काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा आहे. मनसेच्या सुमित बारसकर यांनाही इथे ७०९८ मते मिळाली आहेत. याशिवाय दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी पराभव केला. वंचितच्या तात्यासाहेब ताम्हाणे यांना २६३३ मते मिळाली.

सांगोल्यात देखील असाच काहीसा निकाल लागला. भाजपच्या शाहजीबापू पाटील यांनी शेकापच्या डॉ.अनिकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव केला. वंचितच्या विष्णू यलमार यांना येथे १०४१ मते मिळाली. अनिकेत देशमुख हे ११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. त्यांना थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१० वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ अडचणी असल्यास जूनमध्ये देता येणार परीक्षा

News Desk

पुण्यातील आरोग्य विभाग पूर्णपणे सक्षम, मोठ्या प्रमाणात बेड्सची उपलब्धता !

News Desk

सचिन वाझे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल!

News Desk