HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवला तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू | बाळासाहेब थोरात

मुंबई | शिवसेनेने जर आमच्याकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवला तर आम्ही नक्कीच विचार करू आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, सत्ता स्थापनेचा निर्णय घेऊ, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. राज्यात जनतेने अनपेक्षित असा कौल दिला आहे. यामध्ये काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या, असे थोरातांनी काल (२५ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सागंतिले.

या निवडणुकीत आम्हाला मते चांगली मिळाली. मतविभागणीमुळे आमची संख्या घटली आहे. काही हरकत नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू. शहरी भागात आम्हाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शहरी भागात काँग्रेसचा जनाधार वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे थोरात यावेळी म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. त्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता आमदारांची मानसिकता बदलली असून १० अपक्षही आमच्या संपर्कात आहेत, असा दावा थोरात यांनी केला. मात्र हे दहा आमदार भाजप-शिवसेनेचे आहेत की अपक्ष हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या संपर्कात असलेले ते दहा आमदार कोण? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस बदली प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदविला; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

Aprna

“फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत,” कॉंग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवलेल्या कॉंग्रेसला राऊतांनी दिली समज!

News Desk