HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री माझा भाऊच आहे !

मुंबई | घाबरू नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असे वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी आता मंत्री नाही, आमदाराही नाही, माझ्याकडे कोणतेही पद नाही. परंतु, तुमच्यासाठी राजकारणात आहे. मी पुन्हा एकदा रसत्यावर उतरुन आंदोलन करणार सरकारकडे न्याय मागू, घाबरू नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असा विश्वास पंकजा मुंडेंनी परळीतील जनतेला देऊन त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) बीडच्या परळीतील गोपीनथ गडावर खास मेळ्यावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पंकजा मुडेंनी हा माझ्या बाप्पाच पक्ष आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे.  या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडेंचे स्मारक उभारू नका, पंकजा मुंडेंची विनंती 

“गोपीनाथगडावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे की, गोपीनाथ मुंडेचे स्मारक बनवू नका. पाच वर्ष झाली त्यांचे निधन होऊन. पण माझ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा. मराठवाड्यातील शेतकरी सधन बनवण्यासाठी योगदान द्या. मी उद्धव ठाकरेंवर टीकाही करणार नाही, शुभेच्छा देणार आहे. तुम्ही आताच मुख्यमंत्री झाला आहात, त्यामुळे लगेचच हे करा किंवा ते करा बोलणार नाही. पण माझ्या मराठवाड्याला दिशा द्या. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे संवेदनशीलपणे काम करतील.”

 

Related posts

धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक सुरु

News Desk

पोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारने उडवण्याचा प्रयत्न

Ramdas Pandewad

नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर रायपूरमध्ये बलात्कार

News Desk