HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझा भाऊच आहे !

मुंबई | घाबरू नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असे वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी आता मंत्री नाही, आमदाराही नाही, माझ्याकडे कोणतेही पद नाही. परंतु, तुमच्यासाठी राजकारणात आहे. मी पुन्हा एकदा रसत्यावर उतरुन आंदोलन करणार सरकारकडे न्याय मागू, घाबरू नका, मुख्यमंत्री माझा भाऊच आहे, असा विश्वास पंकजा मुंडेंनी परळीतील जनतेला देऊन त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) बीडच्या परळीतील गोपीनथ गडावर खास मेळ्यावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पंकजा मुडेंनी हा माझ्या बाप्पाच पक्ष आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडेंचे स्मारक उभारू नका, पंकजा मुंडेंची विनंती

“गोपीनाथगडावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी हात जोडून विनंती आहे की, गोपीनाथ मुंडेचे स्मारक बनवू नका. पाच वर्ष झाली त्यांचे निधन होऊन. पण माझ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा. मराठवाड्यातील शेतकरी सधन बनवण्यासाठी योगदान द्या. मी उद्धव ठाकरेंवर टीकाही करणार नाही, शुभेच्छा देणार आहे. तुम्ही आताच मुख्यमंत्री झाला आहात, त्यामुळे लगेचच हे करा किंवा ते करा बोलणार नाही. पण माझ्या मराठवाड्याला दिशा द्या. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे संवेदनशीलपणे काम करतील.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेची मोठी घोषणा, नाशिक मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna