HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची कॉंग्रेससह शिवसेनेवर सडकून टीका

नांदेडः महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी नांदेड पिंजून काढले आहे. रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन भाजप धापाड्यांच्या पक्ष असल्याची टीका केली. यापूर्वी कॉँग्रेसनेही भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. या सर्व आरोपांना सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेद्वारे उत्तर दिले. नांदेडमधील शिवसेना म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे. शिवसेनेला या शहरात सत्ता तर सोडा दोन आकडी नगरसेवकही निवडून आणता येणार नाहीत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. थापाड्यांच्या आश्वासनांना भुलू नका, असे सांगत रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान केले होते. त्याच टीकेला सोमवारी मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस पक्ष ७० वर्षे सत्तेत होता तरीही देशातील गरीबांना घरे मिळाली नाहीत. एकट्या नांदेडात ५० हजार लोक बेघर आहेत. नरकयातना भोगत ते जगत आहेत. त्यांचे हाल अशोक चव्हाणांना दिसत नाहीत का? प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मुंबईत बरेच फ्लॅट आहेत. मात्र नांदेडातील बेघर जनतेच्या डोक्यावर छत असावे, असे त्यांना वाटत नाही. मी नांदेडात आलो तेव्हा, काँग्रेसचे नाते विकासाशी असा फलक वाचला. काँग्रेस आणि विकास यांचा काय संबंध? नांदेडला मागे ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर अशोक चव्हाणांनी केले असाही आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात…

News Desk

आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जावू देवू नका, शिवसेनेकडून अमृता फडणवीसांना सणसणीत उत्तर

swarit

‘पद्मावत’ चित्रपटाने बुडवलेला महसूल सरकाराने वसूल करावा

News Desk