HW News Marathi
महाराष्ट्र

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई । राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या (Municipal Elections) आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Related posts

रायगड किल्ल्यावरील विद्युतीकरणासाठी ६ कोटींचा निधी; भूमिगत वीज वाहिन्यांमुळे रायगडाच्या सौंदर्यावर परिणाम नाही; डॉ.नितीन राऊतांची विधानसभेत माहिती

Aprna

विद्यार्थांना घाबरणारे महाराष्ट्रातील कमजोर सरकार : सचिन सावंत

Adil

नरेंद्र मोदींना ‘मोदीभक्तांकडून’ अनौखी भेट!

News Desk