HW News Marathi
महाराष्ट्र

“वडेट्टीवारांचं वय बघता त्यांना जरा वाट पाहावी लागेल”, थोरातांचा सल्ला

मुंबई। मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर पुढे त्यांना मोठी संधी मिळेल, थोडी वाट पाहावी लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचं वय पाहिलं तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल,थोडी वाट पाहावी लागेल.

मदत आणि पुनर्वसन मंत्री काय म्हणाले होते?

लोणावळ्यात आयोजित ओबीसी शिबीरात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ओबीसी असल्यामुळे महसूल खात्यापासून वंचित राहिलो, असं ते म्हणाले होते. “महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय.

ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली. विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना.” असं लोणावळ्यात चिंतन शिबिरात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग! – मंत्री संजय राठोड

Aprna

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, शिक्षक भरतीची चिंता दूर! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk