HW News Marathi
महाराष्ट्र

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

मुंबई | “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, लढायला होते ते महार आणि दलित होते. कारण ओबीसींना लढायचे नसते,” असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हडांच्या या विधानानंतर आता राज्याचे राजकारण ओबीसी आरक्षणावरून चांगलेच पेटणार आहे. आव्हाडांनी ओबीसींवर केलेल्या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन व्हिडीओ ट्वीट करत आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. 

पडळकरांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत :ला पेटवून घेतले होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत,” अशी टीका त्यांनी केली. 

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ  महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विट हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत आव्हाड म्हणाले, “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, लढायला होते ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचे नसते.  ओबीसींवरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसते घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावे लागेल,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1478027531735371777?s=२०

पडळकर नेमके काय म्हणाले

ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी जी काही प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवं आहे. कारण मा.सर्वोच्च न्यायलयानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दिड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमिन सरकलेली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत.

दुसरीकडे अजित पवार म्हणतात इंपेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणूका आम्ही घेणार नाहीत, वेळ पडली तर प्रशासक नेमू… म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय. ओबीसींवर तुम्हाला एवढच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे,त्यांना आपण निवडूण द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे.

https://twitter.com/GopichandP_MLC/status/1478243256164962306?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफांनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी

News Desk

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

News Desk

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

Aprna