HW Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : राज्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त दाम्पत्याला मिळाला डिस्चार्ज

पुणे |  महाराष्ट्रामधील पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन्ही दाम्पत्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयातून रुग्णवाहिनीमधून घरी सोडण्यात आले. या दोन्ही दाम्पत्य आता ठणठणीत आहे. गेली १४ ते १५ दिवस कुटुंब, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. या कोरोनाबाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्यांच्या डिस्चार्जचा मार्ग मोकळा झाला.

हे दाम्पत्य दुबईहून परतलेल्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर होळीच्या दिवशी त्यांना नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देताना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, ‘पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले होते, त्‍यापैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ ९० टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे.’

 

 

Related posts

मुंबई-पुण्यात ८ दिवसांत, तर राज्यात ‘सप्टेंबर’पासून कोरोना रुग्णसंख्या कमी होणार !

News Desk

खळबळ उडवणाऱ्या मुलाखतीचं काय झालं? हवा आली आणि गेली,निलेश राणेंचा टोला …

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी वाहिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली

News Desk