HW News Marathi
Covid-19

५८३ नवीन रुग्णांचे निदान, कोरोना बाधितांची एकूण संख्या १० हजार ४९८ वर

मुंबई | राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. काल १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (३० एप्रिल) दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. काल झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या

  • मुंबई : ७०६१ (२९०)
  • ठाणे: ४८ (२)
  • ठाणे मनपा: ४१२ (६)
  • नवी मुंबई मनपा: १७४ (३)
  • कल्याण डोंबिवली मनपा: १६३ (३)
  • उल्हासनगर मनपा: ३
  • भिवंडी निजामपूर मनपा: १७
  • मीरा भाईंदर मनपा: १२६ (२)
  • पालघर: ४१ (१)
  • वसई विरार मनपा: १२८ (३)
  • रायगड: २४
  • पनवेल मनपा: ४१ (२)
  • ठाणे मंडळ एकूण: ८२४४ (३१३)
  • नाशिक: ६
  • नाशिक मनपा: २०
  • मालेगाव मनपा: १७१ (१२)
  • अहमदनगर: २६ (२)
  • अहमदनगर मनपा: १६
  • धुळे: ८(२)
  • धुळे मनपा: १७ (१)
  • जळगाव: ३० (८)
  • जळगाव मनपा: १० (१)
  • नंदूरबार: ११ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: ३१५ (२७)
  • पुणे:६३ (३)
  • पुणे मनपा: १११३ (८२)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
  • सोलापूर: ७
  • सोलापूर मनपा: ९२ (६)
  • सातारा: ३२ (२)
  • पुणे मंडळ एकूण: १३७९ (९६)
  • कोल्हापूर: ९
  • कोल्हापूर मनपा: ५
  • सांगली: २८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
  • सिंधुदुर्ग: २
  • रत्नागिरी: ८ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ५३ (२)
  • औरंगाबाद:२
  • औरंगाबाद मनपा: १२९ (७)
  • जालना: २
  • हिंगोली: १५
  • परभणी मनपा: २
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १५० (७)
  • लातूर: १२ (१)
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड मनपा: ३
  • लातूर मंडळ एकूण: १९ (१)
  • अकोला: १२ (१)
  • अकोला मनपा: २७
  • अमरावती: २
  • अमरावती मनपा: २६ (७)
  • यवतमाळ: ७९
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: २
  • अकोला मंडळ एकूण: १६९ (९)
  • नागपूर: ६
  • नागपूर मनपा: १३२ (२)
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर मनपा: २
  • नागपूर मंडळ एकूण: १४३ (२)
  • इतर राज्ये: २६ (२)

एकूण: १०,४९८ (४५९)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk

MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर!

News Desk

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोची गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन

Aprna