HW News Marathi
Covid-19

एकाच दिवसात कोरोनाचे ७४९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात एकूण रुग्ण ३५ हजार ५८ वर पोहोचली

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. काल (१८ मे) २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली असून एकूण संख्या १२४९ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे.

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. काल झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी

  • मुंबई : २१,३३५ (७५७)
  • ठाणे: २३० (४)
  • ठाणे मनपा: १८०४ (१८)
  • नवी मुंबई मनपा: १३८२ (२२)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ५३३ (६)
  • उल्हासनगर मनपा: १०१
  • भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (३)
  • मीरा भाईंदर मनपा: ३०४ (४)
  • पालघर: ६५ (३)
  • वसई विरार मनपा: ३७२ (११)
  • रायगड: २५६ (५)
  • पनवेल मनपा: २१६ (११)
  • ठाणे मंडळ एकूण: २६,६४६ (८४४)
  • नाशिक: १०६
  • नाशिक मनपा: ७४ (१)
  • मालेगाव मनपा: ६७७ (३४)
  • अहमदनगर: ६५ (५)
  • अहमदनगर मनपा: १९
  • धुळे: १२ (३)
  • धुळे मनपा: ७१ (५)
  • जळगाव: २३० (२९)
  • जळगाव मनपा: ६२ (४)
  • नंदूरबार: २५ (२)
  • नाशिक मंडळ एकूण: १३४१ (८३)
  • पुणे: २०४ (५)
  • पुणे मनपा: ३७०७ (१९६)
  • पिंपरी चिंचवड मनपा: १६० (४)
  • सोलापूर: ९ (१)
  • सोलापूर मनपा: ४२० (२४)
  • सातारा: १४० (२)
  • पुणे मंडळ एकूण: ४६४० (२३२)
  • कोल्हापूर: ४४ (१)
  • कोल्हापूर मनपा: ८
  • सांगली: ४५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
  • सिंधुदुर्ग: १०
  • रत्नागिरी: १०१ (३)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: २१६ (५)
  • औरंगाबाद:१६
  • औरंगाबाद मनपा: ९५८ (३३)
  • जालना: ३६
  • हिंगोली: १०४
  • परभणी: ५ (१)
  • परभणी मनपा: २
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ११२१ (३४)
  • लातूर: ४७ (२)
  • लातूर मनपा: ३
  • उस्मानाबाद: ११
  • बीड: ३
  • नांदेड: ९
  • नांदेड मनपा: ६९ (४)
  • लातूर मंडळ एकूण: १४२ (६)
  • अकोला: २८ (१)
  • अकोला मनपा: २४६ (१३)
  • अमरावती: ७ (२)
  • अमरावती मनपा: १०८ (१२)
  • यवतमाळ: १००
  • बुलढाणा: ३० (१)
  • वाशिम: ३
  • अकोला मंडळ एकूण: ५२२ (२९)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: ३७३ (४)
  • वर्धा: ३ (१)
  • भंडारा: ३
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: १
  • चंद्रपूर मनपा: ४
  • नागपूर मंडळ एकूण: ३८७ (५)
  • इतर राज्ये: ४३ (११)

एकूण: ३५ हजार ५८ (१२४९)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी थेट शिवसेनेच्या शाखेतच घेतली बैठक !

News Desk

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेची, कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल !

News Desk

राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा

News Desk