HW News Marathi
Covid-19

कोरोना चाचण्यांच्या दरात घट, आरोग्य विभागाचा निर्णय

मुंबई | कोरोना चाचण्यांच्या दरात घट करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लॅबमधील कोरोना चाचणीचे दर आता ३५० रुपये करण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे दर आज (६ डिसेंबर) कमी करण्यात आले आहे. आणि कोरोना चाचणीचे दर खासगी प्रयोगशाळा, रुग्णालयाना नियम बंधनकारक आहे. दरम्यान, रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील कोरोना चाचणीचे तर ५०० रुपये असेल. तर रुग्णांच्या घरी जावून नमुने घेतल्यास ७०० रुपये दर असेल, हे दर पाळणे बंधनकारक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज टार्स्ट फोर्ससोबत बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत राज्यात नवीन नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत ८ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ६ तर पुण्यात १ रुग्ण सापडला आहे. मुंबईजवळील कल्याण-डोंबिवलीत १ ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ८ वर गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयानं केंद्राला फटकारलं

News Desk

मुकेश अंबानी यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीला ट्रायलची परवानगी

News Desk

“हो मी धावता कोकण दौरा केला पण…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk