HW News Marathi
महाराष्ट्र

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’! – प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई । विद्यार्थ्यांना भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ची सुरूवात होत आहे. याअनुषंगाने ‘एचसीएल’ तसेच ‘ईएन पॉवर’ यांच्यासमवेत दोन सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्यातील कल्पकता आणि सर्जनशीलता ह्याच आपल्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या दिशा ठरवतील. विद्यार्थ्यांना भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि जीवन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमामुळे तरूणांना स्वतःमधील प्रतिभा ओळखण्यास मदत होईल व त्यापुढील करिअरची दिशा ठरवता येईल.

या अनुषंगाने एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या ‘टेक-बी’ या उपक्रमांतर्गत या वर्षी इयत्ता 11 वी व 12 वीच्या जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर याच कंपनीत पात्र विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. त्याचप्रमाणे ‘स्वजीवी महाराष्ट्र’ (स्वप्न, जिद्द आणि विश्वास) या उपक्रमांतर्गत शालेय विद्याथ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविण्यासाठी 488 आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग आणि ‘ईएन पॉवर’ यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र उद्योजकता घडविणारा उपक्रम राबविला जाईल.

यासंबंधीचे सामंजस्य करार करून या उपक्रमांचा आज (६जून )शुभारंभ केला जाणार असल्याची माहितीमंत्री प्रा.गायकवाड यांनी दिली. सदर कार्यक्रम मुंबईसह राज्यातील सर्व 36 जिल्ह्यामधील व्हर्चूअल क्लासरूमच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथे कालपासून विद्यार्थी नोंदणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Vidhansabha2019 : राज्यात महायुतीला अभूतपूर्व विजय मिळणार !

News Desk

‘संज्या तू फटाके खाणारच आहेस पण…, निलेश राणेंचा राऊतांना इशारा

News Desk

६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवच, पडळकरांचा टोला

News Desk