HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चे स्वागत, संकटाचे वळण लक्षात वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे !

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र व देशासमारचे ‘कोरोना’चे भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची गरज असल्याचेही अजित पवार म्हणाले. तर या ‘पॅकेज’चे लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

‘कोरोना’च्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले १ कोटी ७० लाखांचे पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठी आहे, असे मी मानतो. यापुढच्या काळात संकट कसे वळण घेते याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, अशी मागणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे ही जनतेला ही मिळणार आहे. कोरोनाचे संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केले असले तरी त्याचं वितरण तात्काळ होणे अपेक्षित आहे. राज्यात व देशात इमर्जन्सी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

Related posts

कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे तर उपमहापौरपदी महेश सावंत

News Desk

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

News Desk

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

Gauri Tilekar