HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी-भाजपच्या ‘या’ दोन उमेदवारांची मालमत्ता 100 कोटीच्या घरात

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत दोन श्रीमंत उमेदवारांची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे पीयूष गोयल या दोन धनाड्य उमेदवारांची नावे आहे. पटेल आणि गोयल हे दोघेही १०० कोटीच्या घरात यांची संपत्ती आहे. प्रफुल्ल पटेल हे तिसऱ्यांदा खासदारमधून संसदेत जाणार आहे. यात प्रफुल्ल पटेल हे एकदा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेवर जाणार आहेत. पटेलांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली तर तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाणार आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी २०१६ मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे २५२ कोटींची मालमत्ता होती. मग गेल्या सहा वर्षात पटेल यांच्याकडे १८८ कोटी भर पडली असून पटेल यांनी पुन्हा एकदा राज्यसभेसाठी काल (३० मे) उमदेवारी अर्ज दाखल केला. पटेल यांनी अर्जात जंगम मालमत्ता १४ कोटी ३६ लाख, प्रफुल्ल पटेल यांची पत्नीची जंगम मालमत्ता ३४ कोटी १२ लाख या पती-पत्नींची एकत्र कुटुंबाची जंगम मालमत्ता ८० कोटींच्या घरात आहेत. पटेल यांच्या पत्नीकडे सहा ४४ लाखांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आहे. तर पटेल यांच्याकडे ७५ कोटीपर्यंत घरे, जमी आणि व्यापारी जागा आहे. पटेल यांच्यावर १०४ कोटी ५६ लाखांची मालमत्ता आणि त्यांची पत्नी १०७ कोटींची मालमत्ता आहे. 

दरम्यान, गेल्या सहावर्षात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मालमत्तेत देखील वाढ झाली आहे. पियुष गोयल यांची ३८ लाखांवरून ६२ लाखांपर्यंत मालमत्तेत वाढ झालेली आहे. गोयल यांची सहा वर्षापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा गोयल यांची ९० कोटींची मालमत्ता होती. यानंतर गोलय यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर १०० कोटींपर्यंत केली आहे. गोयल यांच्याकडे टोयोटा करोला अल्टीस, टोयोटा कॅमरीच्या दोन अशा तब्बल ८३ लाखांच्या गाड्या आहेत. गोयल यांच्याकडे जंगम मालमत्ता २९ कोटी आणि पत्नीची ५० कोटींची आहे. गोयल दाम्पत्यांकडे साडेसात किलो सोन्याचे दागिने, तसेच हिरे- मोती आहेत. गोयल यांच्याकडे २१ कोटींची मुंबई, पुण्यात घरे आहेत आणि व्यापारी गाळे आहेत.             

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक मोर्चात भाजपाचा संपूर्ण सहभाग असेल!

News Desk

आठवलेंचे स्वप्न भंगले; भाजपने निवडले दोन साथीदार!

News Desk

आजचा सुजाण बालक उद्याचा आदर्श नागरिक | अशोक बनकर

News Desk