HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले”- संजय राऊत

मुंबई। राज्यात गेल्या काही वर्षांपासून कुराणाने सगळीकडे हाहाकार माजवला होता. आणि अशातच अनेकांना प्राणही गमवावे लागले, या पार्श्वभूमीवरच संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यात आले होते. यानंतर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने खडाजंगी पाहायला मिळायची. म्हणूनच आता हाच धागा पकडत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. पण भाजपच्या आंदोलनानंतर लॉकडाऊन उघडले नाही तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. तेव्हा आता आम्हालाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे.

निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट

काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व अॅम्युझमेंट पार्कसुद्धा उघडली जात आहेत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत.

जगा आणि जगू द्या

कायद्याचे बडगे दाखवून गरीबांचे रोजगार बंद पडत असतील तर ते माणुसकीला धरून नाही. देवळांचेही एक अर्थकारण असते. अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे. पोलीस, प्रशासन यांचेही काम त्यातून भागत असते हे आडपडदा ठेवून सांगायची गरज नाही. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका!मुंबई चोवीस तास जागी आहे असे म्हणतात ते याच खाद्य संस्कृतीमुळे, पण लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील हा जिताजागता व्यवसायही बंद पडला. रेस्टॉरंट, जागोजागचे गजबजते ढाबे बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आता हा व्यवसाय नव्याने सुरू होत असला तरी पोलीस व स्थानिक प्रशासनाने या व्यावसायिकांचे फालतूचे शोषण करू नये हीच अपेक्षा.

थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते

पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ असा दिव्य संदेश दिलाच होता. पण थाळ्या वाजवून उपयोग झाला नाही व कोरोनामुळे जशा जागोजाग चिता पेटल्या तशी गंगेच्या प्रवाहातही शेकडो प्रेतांना जलसमाधी देण्यात आली. त्यामुळे थाळ्या आणि घंटा यापेक्षा विज्ञान, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांचे प्राण वाचवत असते. महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉक डाऊनचे टाळे उघडता आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः अशोक चव्हाण

swarit

Live Update : १६९ आमदारांसह महाविकासआघाडीकडून बहुमत सिद्ध

News Desk

मशिदीचे भोंगे हटवले नाही, तर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Aprna