HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रील मशिन कोसळली

पुणे | पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी मोठी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. ही घटना नाशिक फाटा येथे शनिवारी (५ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही.

पुणे महामेट्रोचे ‘पिंपरी ते स्वारगेट’ मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. नाशिक फाटा हे वर्दळीचे ठिकाण असून मेट्रोचे काम सुरू असताना ड्रीलिंग मशिन कोसळली. सुदैवाने मशिन मेट्रो कामाच्या कार्यक्षेत्रात कोसळली, ही मशिन पलिकडे रस्त्यावर कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. परंतु या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

पुण्यात याआधी होर्डिंग कोसळून अपघात

पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे लोखंडी होर्डिंग शुक्रवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास कोसळले होते. या अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून आठ ते नऊ जण जखमी झाले होते या अपघाताप्रकरणी रेल्वेच्या एका अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संजय सिंग (सेक्शन इंजिनिअर) आणि पांडुरंग वनारे (कर्मचारी) अशी या दोघांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

News Desk

प्रेमीयुगुलापुढे पोलीस हतबल

News Desk

महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

News Desk