HW News Marathi
देश / विदेश

पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो, सामनातून टीका

मुंबई | पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमण फोफावला आहे. याआधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी जगासमोर हात पसरले आहेत. कोरोनाचा फैलाव पाकिस्तानला पोखरत आहे. अशी परिस्थिती असूनही त्यांचे कश्मीरचे तुणतुणे या काळातही सुरूच आहे. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने पाक सरकारने संयुक्त राष्ट्राला एक पत्र लिहिले व सांगितले, ‘कोरोनाचे भय वाटत आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या ताब्यातील कश्मीरमधून सैन्य मागे घ्यावे, तसेच तुरुंगातील कैद्यांना मुक्त करावे.’ खरं तर पाकिस्तानात आरोग्यविषयक आणीबाणीने पुढची पायरी गाठली आहे. तेथे कोरोनामुळे आरोग्यविषयक ‘मार्शल लॉ’च पुकारला गेला आहे. तेथे लक्ष देण्याऐवजी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांना कश्मीरबाबत पत्र लिहीत आहे. म्हणजे आपल्या जनतेला कोरोनाच्या संकटातून दूर करणे, तिला अन्न, औषधे, क्वारंटाइन वगैरे सुविधा पुरविणे राहिले बाजूला, हे लोक याही परिस्थितीत कश्मीरचा राग आळवून स्वत:चे हसे करून घेत आहेत. तसेच पाकिस्तातानमध्ये सरकारी मदत देताना हिंदूंना वगळले जात आहे. सरकारी मदत, अन्नधान्य फक्त मुसलमानांसाठीच आले आहे असे सांगून रांगेत उभ्या राहिलेल्या हिंदूंना बाहेर काढले जात आहे. पाकिस्तानचे असे वागणे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. पाकिस्तानची लोकसंख्या साधारण 20 कोटी आहे. पाकिस्तामधील अर्थव्यवस्था, कोरोनाचा वाढता फैलाव आणि सरकारी मदत देताना हिंदूंना वगळले, यावरून सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीका केली आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

खरं तर पाकिस्तानात आरोग्यविषयक आणीबाणीने पुढची पायरी गाठली आहे. तेथे कोरोनामुळे आरोग्यविषयक ‘मार्शल लॉ’च पुकारला गेला आहे. तेथे लक्ष देण्याऐवजी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांना कश्मीरबाबत पत्र लिहीत आहे. म्हणजे आपल्या जनतेला कोरोनाच्या संकटातून दूर करणे, तिला अन्न, औषधे, क्वारंटाइन वगैरे सुविधा पुरविणे राहिले बाजूला, हे लोक याही परिस्थितीत कश्मीरचा राग आळवून स्वत:चे हसे करून घेत आहेत. पाकिस्तानसारखे बिनडोक, अमानुष, निर्लज्ज देश म्हणजे धरतीला बोझ बनले आहेत. असा शेजार ज्यांना लाभतो, त्यांचाही आयुष्यभराचा छळच होतो. हिंदुस्थानच्या वाट्याला हा छळ आला आहे खरा. पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो!

जगातील दोनशेंच्या आसपास देशात कोरोना व्हायरसने हडकंप माजवला आहे, पण अमेरिका, चीन, ब्रिटन वगैरे देशांत कोरोना संक्रमणाची काय स्थिती आहे यापेक्षा पाकिस्तानात कोरोनाची काय अवस्था आहे यात हिंदुस्थानी जनतेला जास्त रस आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ, श्रीलंका, बांगला देश, म्यानमार ही आपली शेजारी राष्ट्रे आहेत. त्यामुळे शेजारच्या घरात चुलीवर काय शिजतेय? तेथे कोणाचे काय बोलणे सुरू आहे हे आपण जाणून घेत असतो. अर्थात, आपले कान लागले आहेत ते पाकड्यांच्या भिंतींना. बरं, कोरोनानंतर तरी पाकड्यांचे वाकडे शेपूट सरळ झाले आहे काय? तर अजिबात नाही. पाकिस्तान या संकटसमयीदेखील तोच द्वेषाचा आणि धर्मांधतेचा घाणेरडा खेळ करीत आहे. पाकिस्तानातून आलेली एक बातमी तर चीड आणणारी आहे. ‘लॉक डाऊन’मुळे पाकिस्तानच्या जनतेवर घराबाहेर पडण्यास बंधने लादली गेली आहेत. तेथील पंतप्रधान इम्रान खान यांनी काही प्रांत लष्कराच्या ताब्यात दिला. त्यामुळे अशा प्रांतांमध्ये रेशन-पाणी पोहोचविण्याचे काम लष्कराचे लोक करीत आहेत. मात्र रेशन देताना हिंदू आणि मुसलमान असा सरळ सरळ

भेदभाव

केला जात आहे. सिंध प्रांतात सगळ्यात जास्त कोरोना संक्रमण झाले आहे. या प्रांतातील कराची हे महत्त्वाचे, सदैव गजबजलेले शहर आहे. कराची म्हणजे पाकिस्तानची मुंबई असे म्हटले जाते. कराचीत कोरोना संक्रमण फोफावल्यामुळे कडक निर्बंध लादले गेले आहेत. पण तेथे सरकारी मदत देताना हिंदूंना वगळले जात आहे. सरकारी मदत, अन्नधान्य फक्त मुसलमानांसाठीच आले आहे असे सांगून रांगेत उभ्या राहिलेल्या हिंदूंना बाहेर काढले जात आहे. पाकिस्तानचे असे वागणे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. पाकिस्तानची लोकसंख्या साधारण 20 कोटी आहे. त्यात हिंदू अल्पसंख्याक सत्तर लाख आहेत. हे हिंदू पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यामुळे अशा कठीणप्रसंगी हिंदूंना अन्नधान्य नाकारणे हे अमानुषतेचे लक्षण आहे. पाकिस्तानचा एक निर्घृण, भेसूर चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे. पाकिस्तानातील हिंदूंवर सतत अत्याचार होतात. हिंदू आया-बहिणींवर बलात्कार होतात. हिंदूंवरील अन्यायाची कोणत्याही न्यायालयात तड लागत नाही. त्यात आता हिंदूंना रेशनवरील अन्नही नाकारले. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकडय़ांना खेचण्यासाठी ही उत्तम केस आहे. पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक स्थिती खतरनाक आहे. आतापर्यंत तीन हजारांवर लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. 30 लोक मरण पावले आहेत. पण हा आकडा यापेक्षा कित्येक पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा म्हणजे आजही कच्चे मडके आहे. अफगाणिस्तान, इराण सीमेवरील प्रांतांमध्ये आजही हडप्पा जमान्यातल्या व्यवस्था आहेत. संपूर्ण पाकिस्तानात ‘व्हेंटिलेटर’ फक्त दोन हजार आहेत. मास्क नाहीत. डॉक्टर्स देखील नाहीत. हे सर्व आता पाकिस्तानला चीनकडून मिळणार आहे. तोपर्यंत कोरोना कोणत्या स्तरावर पोहोचला असेल याची खात्री नाही. इम्रान खान हे आधी ‘लॉक डाऊन’ करायला तयार नव्हते. पाकिस्तानची आर्थिक घडी आधीच विस्कटली आहे. ती साफ नष्ट होईल. लोक आधीच भूकेकंगाल आहेत. ते भूकेने मरतील असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यात पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी जगासमोर हात पसरले आहेत. कोरोनाचा फैलाव

पाकिस्तानला पोखरत

आहे. अर्थात, अशी परिस्थिती असूनही त्यांचे कश्मीरचे तुणतुणे या काळातही सुरूच आहे. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने पाक सरकारने संयुक्त राष्ट्राला एक पत्र लिहिले व सांगितले, ‘कोरोनाचे भय वाटत आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या ताब्यातील कश्मीरमधून सैन्य मागे घ्यावे, तसेच तुरुंगातील कैद्यांना मुक्त करावे.’ खरं तर पाकिस्तानात आरोग्यविषयक आणीबाणीने पुढची पायरी गाठली आहे. तेथे कोरोनामुळे आरोग्यविषयक ‘मार्शल लॉ’च पुकारला गेला आहे. तेथे लक्ष देण्याऐवजी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांना कश्मीरबाबत पत्र लिहीत आहे. म्हणजे आपल्या जनतेला कोरोनाच्या संकटातून दूर करणे, तिला अन्न, औषधे, क्वारंटाइन वगैरे सुविधा पुरविणे राहिले बाजूला, हे लोक याही परिस्थितीत कश्मीरचा राग आळवून स्वत:चे हसे करून घेत आहेत. पाकिस्तानसारखे बिनडोक, अमानुष, निर्लज्ज देश म्हणजे धरतीला बोझ बनले आहेत. असा शेजार ज्यांना लाभतो, त्यांचाही आयुष्यभराचा छळच होतो. हिंदुस्थानच्या वाटय़ाला हा छळ आला आहे खरा. पाकड्यांनो, आधी कोरोनाची चिंता करा हो!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीविरोधात आता शिवसेनेची नाराजी ! खासदाराने दिला राजीनामा…

News Desk

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तुंचीच विक्री

News Desk

भारताला धक्का, तिरंदाजीत दीपिका कुमारीचा क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव 

News Desk