HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादीविरोधात आता शिवसेनेची नाराजी ! खासदाराने दिला राजीनामा…

परभणी | राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या खासदाराने आपलाच मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादीवर अनेक आरोप करत थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सत्तेत असुनही काम होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची? फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप करत शिवसेनेच्या खासदाराने आज राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे.पाहा पत्र

byपत्रात त्यांनी लिहील्याप्रमाणे , जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले आहेत.

“स्थानिक शिवसैनिकांच्या इच्छा आपण पूर्ण करु शकत नसलो, आपल्या कार्यकर्त्यांना योग्यपणे न्याय देता येत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही”, अशी भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.मी खासदार म्हणुन राजीनामा देतो आहे मात्र शिवसैनिक म्हणुन काम करत राहीन अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या खासदारीने राजीनामा दिल्याने आता महाविकासआघाडीत खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

Gauri Tilekar

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला २ वर्ष मुदतवाढ द्यावी, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

News Desk