HW News Marathi
महाराष्ट्र

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

बीड | पेट्रोलच्या किंमती आवाक्याबाहेरचे जात असल्याने सरकारकडून इलेकट्रीक वाहनांना सबसिडी देवुन चालना देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. परंतु, सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जात आहे. बीड जिल्ह्याच्या परळीतील ग्राहक सचिन गित्ते यांनी खरेदी केलेली इलेकट्रीक दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही. कंपनीकडून कसलाच रिप्लाय येत नसल्याने त्रस्त ग्राहक गित्ते यांनी सदरील बंद पडलेली दुचाकी गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला व ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याने त्या घेवू नयेत असे यावेळी जनतेला आवाहन ही केले.

परळी येथील व्यापारी सचिन गित्ते यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी २० हजार रु.भरत ओला कंपनीची ऑनलाईन बुकींग केली २१ जानेवारी २०२२ रोजी उरलेले 65 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी सदरील दुचाकी गित्ते यांच्या ताब्यात देण्यात आली.सहा दिवसानंतर ही दुचाकी बंद पडली.त्यानंतर कंपनीकडे संपर्क साधला कंपनीचा मेकॉनिक येवुनही दुचाकी सुरु झाली नाही.कंपनीकडुन हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका,जिल्हा,विभागीय स्तरावर शोरुम नसल्याने सचिन गित्ते कष्टमर केअर नंबरवर वारंवार फोन करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.पैसे देवुन घेतलेली दुचाकी बंद पडल्याने व कंफनीकडुन कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी रविवार (२४ एप्रिल) सदरील बंद पडलेली दुचाकी गाढवाने ओढत गांधिगीरी केली.गाढवाच्या पाठीवर ओला कंपनीचा निषेध असलेले फलक लावुन ओला या फसव्या कंपनीपासुन सावध रहावे,ओला कंपनीच्या दुचाकी खरेदी करु नका असे जाहिरपणे सांगत राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रस्त्यावरुन गाढवाच्या पाठिमागे दुचाकी बांधत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला.सचिन गित्ते यांच्या या निषेधाची परळी शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

ओला कंपनीची दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडल्यानंतर दोन महिने कंपनीशी संपर्क साधुनही दुरुस्ती अथवा बदल्यात दुचाकी न मिळाल्याने ग्राहक मंचाकडे तक्रार केली असुन हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणार्या ओला कंपनीकडून ग्राहकांना कसलेच आर्थिक संरक्षण नसल्याने सरकारने या कंपनीची चौकशी करुन कारवाई करावी याबाबत ग्राहक मंचात तक्रार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना साद

News Desk

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य ! | अजित पवार

News Desk

भाजप शक्तिप्रदर्शन स्वबळावरील सत्तेसाठी

News Desk