HW News Marathi
महाराष्ट्र

अनेक आंदोलनाचा साक्षी असलेल्या लिंबाच्या झाडाचा अखेर अंत!

बीड | बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जवळपास ५० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कडुनिंबाच्या झाडाला, कुंपण लावण्याऐवजी ते झाडचं बीडच्या प्रशासनाने तोडलं आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्यानंतर हे झाड चर्चेत आलं होतं. २६ जानेवारीला याच झाडाचा सहारा घेत कामगार महिलांनी झाडावर चढून आंदोलन केले होते. 

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पन्नास वर्षांपूर्वीचं, लिंबाचे झाड होतं. या लिंबाच्या झाडांमुळे एकही अपघात अद्याप झाला नाही. मात्र, या झाडावर काही दिवसांपूर्वी, आंदोलनकर्त्या नगरपालिकेच्या महिलांनी चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं. प्रजासत्ताक दिना दिवशी महिला झाडावर चढल्याने आणि खाली उतरत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी या झाडावर चडून त्या महिलेला खाली उतरवलं होतं. आणि त्यानंतर हे झाड चर्चेत आलं होतं. तर यामुळे या झाडाला कुंपण लावावं, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली होती. अखेर हे झाड तोडल्याने, सामाजिक कार्यकर्ते व वृक्ष प्रेमी मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत तर

याच झाडाला साक्षी मानून कित्येक आंदोलन कर्त्यांची आंदोलनं सुद्धा केली होती. मात्र, आता हेच झाड जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी झाल्यामुळे याचा करून अंत करण्यात आला असल्याच्या चर्चा संबंध जिल्ह्यात चांगल्याच रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षाची निवड होणार?

Aprna

जाणून घ्या १० वी-१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार

News Desk