HW Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची स्थापना

सातारा । मराठा समाजाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाची आज(८ नोव्हेंबर) स्थापना केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्वर येथे नव्या पक्षाची घोषणा केली. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून नव्या पक्षाची घोषणा केली आहे.  यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स याठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र तरीही मराठा समाजाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. ‘मराठा आरक्षण संघर्ष समिती’ची पहिली बैठक नरिमन पॉइंट येथे झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रातील गावागावात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर मराठा क्रांती मोर्चामार्फत ‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे. तर मुंबईत ही ‘मराठा संवाद यात्रा’ २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार आहे.

Related posts

ध्येय मोठे ठेवल्यास यशापर्यंत पोहोचता येते !

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरत नाही

News Desk

आदित्य ठाकरेंना खड्यांचा फटका, आलिशान रेंजरोव्हरचे फुटले टायर

News Desk