HW News Marathi
मनोरंजन

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो नाही

मुंबई । ‘डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम न दिल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू,असा इशारा मनसेने दिला आहे. अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. काशीनाथ घाणेकर सिनेमाचा दिवसभरात केवळ एकच शो होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन- आमिर खान यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाचे दिवसभरात अनेक शो सुरू आहेत. एकूण हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू पसरवण्यात कमी पडला आहे. या तुलनेत काशीनाथ घाणेकर सिनेमांला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit

सनीला हवाय मुलगाच…

News Desk

अनु मलिक यांचे मराठीत पदार्पण

News Desk