HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाकडून महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची स्थापना

सातारा । मराठा समाजाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाची आज(८ नोव्हेंबर) स्थापना केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्वर येथे नव्या पक्षाची घोषणा केली. मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून नव्या पक्षाची घोषणा केली आहे. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स याठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र तरीही मराठा समाजाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. ‘मराठा आरक्षण संघर्ष समिती’ची पहिली बैठक नरिमन पॉइंट येथे झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रातील गावागावात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर मराठा क्रांती मोर्चामार्फत ‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे. तर मुंबईत ही ‘मराठा संवाद यात्रा’ २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांच्यावर भाजपचा आणखीनच दृढ विश्वास ! सोपवली नविन जबाबदारी

News Desk

भाजप सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही!, ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता मोदींच्या कानमंत्रावर चालतो ,राज्यपालांचा गौप्यस्फोट!

News Desk