HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरून बीडमध्ये राडा!

बीड | बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. आज (२४ जून) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागताच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा सोळुंके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. यांची निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर याचा निषेध नोंदवत शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदवला होता. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीदरम्यान पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात शाई घेऊन जाऊन मिरवणूक दरम्यान फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पापा सोळुंके व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली. यावेळी पापा सोळुंके यांना जबर मार लागला असल्याची माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी; शौचालयाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासन सर्व प्रकारची मदत करेल! – मुख्यमंत्री

Aprna

ओबीसी आरक्षणाचा तिढा कधी संपेल?, विजय वडेट्टीवार म्हणाले….

News Desk

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

News Desk