HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात गेला महिनाभर सुरु ‘कोरोना’चा हाहाकार

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनाबाधितांची संख्या ११३५ वर येऊन पोहोचली आहे. तर कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (८ एप्रिल) दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, एका महिन्यापूर्वी म्हणजे ९ मार्च रोजी महाराष्ट्र कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती.

राज्यात पुण्यातील दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळली होती. या दाम्पत्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयता पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दाम्पत्यांच्या कुटुंबीय आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणीसाठी बोलविल गेले होते. या दाम्पत्यांनी लग्नाच्या वाढदिवसानंतर कुटुंबासोबत २४ ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबई फिरण्यासाठी गेलो होतो. यानंतर आम्ही १ मार्च रोजी मायदेशी परतल्यानंतर एक-दोन दिवसात मला ताप येऊ लागला. मी यानंतर आमच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांनी माझे रिपोर्ट पाहिले. आणि माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याचे सांगितले. यानंतर मी स्वत: पुण्यातील नायडू रुग्णालयात जाणून चाचणी केली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली असून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. यामुळे मला तात्काळ डॉक्टरांनी क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार असल्याचे सांगितले.

या दाम्पत्यांनी मुलीसह त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ओला कार चालकाचाही समावेश आहे. सदर दाम्पत्य नुकतेच दुबईहून मुंबईला विमानाने आले. यानंतर मुंबईहून पुण्यापर्यंत त्यांनी ओलाने प्रवास केला. या प्रवासात त्यांच्यासोबतच्या चालकालाही कोरोना झाल्याची माहिती मिळली दरम्यान, हे पाच रुग्ण अनेकांना भेटले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू केले. या दाम्पत्यांला २५ मार्चला कोरोनामुक्त देखील झाले. या दाम्पत्यांना नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णवाहिनेतून सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांना घरी सोडले.

संबंधित बातम्या :

HW Exclusive : कोरोनाशी झुंज देणाऱ्या त्या कोरोनामुक्त लढवय्यांचा प्रवास

Corona Positive To Corona Negative | ‘कोरोनाग्रस्त ते कोरोनामुक्त’ पुण्यातल्या दाम्पत्याचा प्रवास

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

News Desk

देवेंद्र फडणवीसही आता करणार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव नको, बॅनर्स, होर्डिंग लावू नका, भाजपने केलं आवाहन

News Desk