HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोना बळी,तर राज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू

पुणे | महाराष्ट्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे ही कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात राज्यात कोरोनामुळे ४ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला तर पुण्यात कोरोनामुळे पहिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (४ मे ) घडली आहे. पुण्यात आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे (५७ वर्षीय ) यांना कोरोनाची लागण झाली होती.

लोंढेंना धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष ५५ वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. आज दुपारी दीड वाजता लोंढ यांचा मृत्यू झाला. पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १०६ वर पोहोचला आहे. यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, राष्ट्रवादीमध्ये खळबळ

News Desk

आघाडीची सत्ता आली अन् दलित,शोषित घटकावर अत्याचार वाढल्या! – राम सातपुते

Aprna

मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस

News Desk