नागपूर | हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणीने आज (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाल्याची माहिती ऑरेज रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. ऑरेज रुग्णालयातील उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच दारोडा तिच्या गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थानी सर्व दुकाने बंद करत चंद्रपूर आणि नागपूरमध्ये रस्तारोक केला. पीडित तरुणीला दारोडा गावी तिचा मृतदेह गावी घेऊन जाणारी रुग्णवाहिनी ग्रामस्थानी अडवत आरोपीच्या मृत्यूची मागणी केली.
Live Update
- पीडित तरुणी पंचत्वात विलीन
- मान खाली घालायला लावणारी घटना – नितीन गडकरी
हिंगणघाट येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. समाज म्हणून ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे.या घटनेतील आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल हा विश्वास आहे.पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सरकार आणि समाज दोघांनीही दक्षता घ्यायला हवी.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 10, 2020
- पीडित तरुणीवर संध्याकाळी चार वाजेनंतर होणार अंत्यसंस्कार
- आरोपीला लवकरात लवकर फासावर चढवू, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करू, असे कृत्य करण्याचे धडस होणार नाही, असा कायदा करू. आणि संयम बाळगण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
- पीडित तरुणीचा मृतदेह दारोडा गावात आणला, पीडितेच्या घाराबाहेर ग्रामस्थानची गर्दी उसळली
- हिंगणघाटमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 300 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- हिंगणघाट प्रक आरोपीला लवकरता लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरका कटिबद्ध केली पाहिजे. कायदा आणखी कठोर करण्याची गरज असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांनी हिंगणघाट जळीत कांडावर प्रतिक्रिया दिली.
- अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती, असे ट्वीट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
- माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाट, असे ट्वीट बाल कल्याण आणि महिला विकास मंत्री यशोमती ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया #हिंगणघाट
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 10, 2020
-
हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यु झाला .. सुन्न आणि अपराधी वाटत आहे ..इतक्या शतकांत आपण स्त्री ला प्रधानमंत्री, राष्ट्रपती,सरंक्षण मंत्री पाहू शकलो पण सामान्य स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्री ला सुरक्षा नाही देऊ शकलो.. फाशी दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला, असे ट्वीट माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यु झाला .. सुन्न आणि अपराधी वाटत आहे ..इतक्या शतकांत आपण स्त्री ला प्रधानमंत्री, राष्ट्रपती,सरंक्षण मंत्री पाहू शकलो पण सामान्य स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्री ला सुरक्षा नाही देऊ शकलो.. फाशी दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला .
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 10, 2020
- ती आपल्यातून निघून गेली पण तिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी राज्य शासनाकडे करणारे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी पीडित तरुणींला श्रद्धांजलीही वाहिली आहे.
हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 10, 2020
- हिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा आणि तुझ्या न्यायासाठी महाराष्ट्र सोबत आहे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला.जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे.या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून जेंव्हा तिला न्याय मिळेल तेंव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल.@AnilDeshmukhNCP@OfficeofUT
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 10, 2020
- हिंगणघाट पीडित तरुणीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.
- हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीने आज (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाल्याची माहिती ऑरेज रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.