HW News Marathi
महाराष्ट्र

नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये अचानक लागली आग

नंदुबार | नंदुबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसला अचानक आग लागली. गांधीधाम एक्स्प्रेसमधील एका डब्याला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट झाली आहे. गाडी नंदुबार स्टेशला येण्याआधीच आग लागली होती. आगीमुळे स्टेशन परिसरात धुराच्या लोट पसरले. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

गांधीधाम एक्स्प्रेस आज (२९ जानेवारी) अकरा वाजताच्या सुमारास नंदुबार रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेलनाही. परंतु रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमणात गर्दी जमा झाली आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार

News Desk

ठाण्यात डेल्टा पल्सचे चार रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली!

News Desk

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा! – अजित पवार

Aprna