HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्पात ठाकरे सरकारने ‘स्टॅम्प ड्युटी’मध्ये दिली ऐवढी सवलत

मुंबई | महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (६ मार्च) विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील घर खरेदीवर आर्थिक मंदीचे सावल होत. राज्यातील बांधकाम विभागाला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात १ टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत जाहीर केली आहे. या नवे घर खरेदी करताना सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती. मात्र, ती स्टॅम्प ड्युटी येत्या दोन वर्षात पाच टक्के असणार आहे.

मुद्रांक शुल्क सवलतमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र आणि पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपुर या महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क व इतर निगडीत भारामध्ये पुढील दोन वर्षांच्या कालावधीकरिता १ टक्के सवलत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयामुळे सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटी रूपयांचा ताण पडणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवासासाठी खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

News Desk

संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे!

News Desk

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘आरे’ मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती !

News Desk