HW News Marathi
महाराष्ट्र

थकबाकी वसुलीसाठी सरकारकडून बाऊ केला जातोय – देवेंद्र फडणवीस

मुंबई। वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर संपूर्ण राज्य अंधारात जाऊ शकतं, अशी चिंता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. थकबाकीची वसुली करण्यासाठी सरकारकडून बाऊ केला जातोय अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीजबिल वसुली करण्यासाठी सरकारचा हा डाव आहे, असं देखील फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

जबरदस्तीने वसुली करण्याकरिता हा बाऊ केला जात आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यात थकीत वीजबिलांसंदर्भात राऊत यांनी माहिती दिली. यावरुन देवेंद्र पडणवीस यांनी टीका केली आहे. “त्यांनी जे सादरीकरण केलं त्यामध्येच लक्षात येतं की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. ही थकबाकी आपण दाखवतोय, यामध्ये विशेषत: कृषी पंपांच्या संदर्भात क्रॉस सबसीडी करतो. त्यानंतर जे काही आपलं नुकसान आहे, ते नुकसान भरुन काढण्याकरिता आपल्याला जो जकात मिळतो, त्यातुन नुकसान भरुन काढतो. त्यामुळे या ठिकाणी जबरदस्तीने वसुली करण्याकरिता हा बाऊ केला जात आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी, सामान्य माणूस अडचणीत आहे. तो अडचणीत असताना त्याला मदत करण्याऐवजी जबरदस्तीने वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली या सरकारला करायची आहे. त्यामुळे हे सगळं नाटक सुरु आहे,” अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरुन देखील राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. निवडणुका लागल्या आहेत त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठे दिसत नाही हे यातून स्पष्ट झालं आहे, असं फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात सुमारे 5000 महिलांनी केली कुपोषणाबाबत जनजागृती

News Desk

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी; खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk

“अनिल परबांची साडी-चोळी, नारळ देऊन ओटी भरणार!”, पडळकरांची जहरी टीका

News Desk