HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध !

पुणे | “गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध राहील,” असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केले. सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहे. शिवनेरी आपले वैभव आहे. या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता राज्य शासन घेत आहे. शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी तातडीने २३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.

शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा पुढच्या महिन्यात सरपंच मेळावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

News Desk

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk

वीज बिल माफीसाठी उर्जामंत्र्यांना उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची साथ नाही, माजी उर्जामंत्र्यांचा आरोप

News Desk